Maharashtra Budget Session 2023 LIVE : शिंदे सरकारच्या पहिल्या अधिवेशनास आज सुरुवात; पहा काय घडले?

एमपीसी न्यूज : आजपासून राज्यातील अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget Session 2023 LIVE) अधिवेशनाला 11 वाजता प्रारंभ झाला. विधान भवनाला विविध रंगाच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. यंदाच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला असून आजचे अधिवेशनचे कामकाज संपले असून उद्या पुन्हा 11 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे. कोरोना काळातील सर्वाधिक जास्त काळातील हे अधिवेशन असून 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. 


12.21 वाजता : मिलिंद नार्वेकर चुकून सभागृहात
मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही चुकून सभागृहात बसले. आदित्य ठाकरेंनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते उठून बाहेर गेले.


12 वाजता : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा – छगन भुजबळ

सभागृहात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यासोबतच त्यांनी म्हंटले, की मराठी भाषेचं वय अडीच हजार वर्षे असून मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी आहे. हा विषय राजकारणमध्ये न आणता पाठपुरावा केला जावा.

Chakan : ‘शिवगर्जना’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद


11:30 वाजता : शिवसेनेचा व्हिप ठाकरे गटाला अमान्य 

अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget Session 2023 LIVE) अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा व्हिप जारी केला. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, शेतकऱ्यांचे काय झाले?, जुनी पेन्शन योजना, धनगर समाज, ओबीसी समाज, मराठा समाजाचे काय झाले, शिंदे गटाला या सर्वांशी काही देणेघेणे नाही. हे सत्तापिपासू आहेत. ही जुमला पार्टी आहे. त्यांना येणारी निवडणुक सत्तेच्या, भ्रष्टाचाराच्या कुठल्याही मार्गाने जिंकायची आहे. कोंबडी हूलला आम्ही घाबरत नाहीत असे वक्तव्य केले. यावर हा व्हीप केवळ उपस्थितीसाठी दिला आहे असे उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिले.


11:15 वाजता : राज्यपाल रमेश बैस यांचं विधानसभेत अभिभाषण 

राज्यपाल रमेश बैस यांचं विधानसभेत अभिभाषण सुरू झाले असून त्यांनी सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार असल्याचे जाहीर केले. तसेच, पेन्शन योजनेतही सरकारने सुधारणा केल्याचे म्हंटले. तसेच आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केल्याचे म्हंटले आहे.


11.03 वाजता : नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस विधानभवनात

राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस हे विधानभवनात दाखल झाले. राज्यपाल यांच्यासोबत  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपसभापती निलम गोऱ्हे देखील उपस्थित होते.


सकाळी 11 वाजता : शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात 

शिंदे सरकारचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अधिवेशनाला सुरुवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.