Maval Crime : मावळात पोलिसांसमोर टोळक्याची हाणामारी, पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मावळातील माळवाडी येथे पोलिसांसमोर (Maval Crime) दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

सोमनाथ आनंदा शिंदे (वय 51, रा. तळेगाव स्टेशन), विशाल बाळू पारधे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे), नितीन पांडुरंग धोतरे (वय 39, रा. तळेगाव दाभाडे), विकास जिजाबा येवले (वय 31), सागर तानाजी दिवसे (वय 32, दोघे रा. कान्हेवाडी, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत सोरटे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtra Budget Session 2023 LIVE : शिंदे सरकारच्या पहिल्या अधिवेशनास आज सुरुवात; पहा काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात कारणावरून एकमेकांसोबत भांडण करत होते. दरम्यान फिर्यादी पोलीस शिपाई प्रशांत सोरटे हे घटनास्थळी गेले असता आरोपींनी पोलिसांसमोर एकमेकांना (Maval Crime) लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत सार्वजनिक शांततेचा भंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.