Maharashtra Corona Update : राज्यात आज 76 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद, 63 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) दिवसभरात 5,455 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 76 रुग्ण ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. आज दिवसभरात 63 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 35 हजार 088 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 26 हजार 868 जण बरे झाले आहेत. आज 14 हजार 635 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.34 टक्के एवढा झाला आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 60 हजार 902 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,392 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 6,10,718 जण होम क्वारंटाईन आहेत.

आज 76 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 76 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी पुण्यात 46, पुणे ग्रामीण 4, अमरावती 12, जालना 8, वर्धा 3 आणि अहमदनगर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.