Pimpri News: महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ सादर करणा-या ‘सिक्युअर’वर गुन्हा

नगरसेवक तुषार कामठे यांचा यशस्वी पाठपुरावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेची फसवणूक करणा-या सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप नगरसेवक तुषार कामठे यांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली. कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कागदपत्रे सादर केली. अजिदादांनी चुकीच्या कामाला पाठिशी न घालण्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील यांनी कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला. अजितदादांचे मी मनापासून आभार मानतो असे नगरसेवक कामठे यांनी सांगितले.

काय म्हटले आहे उपायुक्तांनी?
याबाबत महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त सदीप खोत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आरोग्य विभाअंतर्गत अ व ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करणेकामी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने प्राप्त लघुत्तम दर निविदा धारक मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. पुणे यांनी निविदा अटी शर्तींनुसार महानगरपालिकेस सादर करावयाच्या परफॉरमन्स सिक्युरिटी डिपॉझिट स्कमेपोटी मादर करावयाच्या एकूण रुपये 6 कोटी 90 लाख 31 हजार  एवढ्या रकमेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया एमजी रोड फोर्ट मुंबई या शाखेच्या बँक गॅरंटी महापालिकम सादर केलेल्या होत्या. तथापि, सदर बँक गॅरंटी या बनावट असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेमार्फत प्रत्यक्ष शहानिशा केली असता. सादर केलेल्या बँक गॅरंटी या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सबब में सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. पुणे यानी सदर प्रकरणी महापालिकेची खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याने त्यांच्या विरोधात पिंपरी पोलिस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.