Sangavi News: सांगवीतील जलतरण तलावाचे आधुनिक पध्दतीने नुतनीकरण

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 32 सांगवी मधील जलतरण तलावाचे आधुनिक पध्दतीने नुतनीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.  यावेळी नगरसदस्या शारदा सोनवणे, नगरसदस्य हर्षल ढोरे, संतोष कांबळे, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, उपअभियंता अब्दुल हमीद मोमीन, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

जुनी सांगवी येथे जलतरण तलावाचे नुतनीकरण करण्यात येणार असून तलाव परिसरात  कुस्तीचे मैदान, जॉगिंग ट्रॅक, कंपाऊंड वॉल आणि प्रवेशद्वार, नवीन बेबी पूल, प्रोफ्लेक्स रुफिंग कव्हरींग स्विमिंग टँक, चेंजिंग रुम, एलिव्हेशन, फसाड डिझाईन, पोर्सेलिन पूल टाईल, सेरा पूल टाईल्स, पोर्सेलिन फिंगर ग्रिप टाईल, अँटीस्लीप आणि डेक टाईल्स, अंतर्गत आणि बाह्य बाजूस रंग लावणे या कामांचा समावेश आहे.  तसेच महिलांकरीता सुसज्ज कुस्ती प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे.  या कामासाठी सुमारे 3 कोटी 98 लाख इतका खर्च येणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे यांनी दिली.


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.