Maharashtra Corona Update : राज्यात आज 16,715 जण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 80.81 टक्के

एमपीसी न्यूज – राज्यात दररोज नव्याने वाढ होणा-या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज राज्यात 16 हजार 715 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले तर 14 हजार 578 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 80.81 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 लाख 80 हजार 489 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 लाख 96 हजार 441 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 44 हजार 527 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 355 रुग्ण दगावले आहेत आत्तापर्यंत राज्यात 39 हजार 072 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आतापर्यंत 73 लाख 24 हजार 188 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 14 लाख 80 हजार 489 नमूणे सकारात्मक आले आहेत. 22 लाख 48 हजार 741 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 25 हजार 655 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.