Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,678 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज, बुधवारी 4 हजार 678 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 17 लाख 69 हजार 897 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहोचले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात 4 हजार 304 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 80 हजार 893 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 61 हजार 454 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 48 हजार 434 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या 2.56 टक्के एवढा आहे. रुग्णांची संख्या कमालीची घटली असल्याचे आजच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.