Maharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट हा 92.44 टक्के; 24 तासात 7809 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : राज्यात आत्तापर्यंत 16 लाख 5 हजार 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, गेल्या 24 तासात 7 हजार 809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 92.44 टक्के झाला आहे.
आज राज्यात 4 हजार 496 नव्या रुग्णांचे निदान झाले. गेल्या 24 तासात 122 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 टक्के इतका असल्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सांगितले.
राज्यात आज, गुरुवारी 4496 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. एकूण 1605064 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात एकूण 84627 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.44 टक्के इतके आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 96 लाख 64 हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 36 हजार 329 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8, 11, 035 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर 6 हजार 487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
सध्या राज्यात 84 हजार 627 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 496 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 17 लाख 36 हजार 329 इतकी आहे.
आज नोंद झालेल्या 122 मृत्यूंपैकी 85 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 37 मृत्यू हे मागील आठवड्यातील असल्याचे आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.