Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 11,204 जण कोरोनामुक्त तर, 9,060 नवे रुग्ण

0

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 204 जण कोरोनामुक्त झाले. तर, आतापर्यंत राज्यभरात एकूण 13 लाख 69 हजार 810 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 85.86 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. 

राज्यात आज दिवसभरात 9 हजार 60 नवे करोनाबाधित आढळले असून, 150 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचबरोबर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 15 लाख 95 हजार 381 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 1 लाख 82 हजार 973 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत 13 लाख 69 हजार 810 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, 42 हजार 115 जणांचा मृत्यू झाला आहे.राज्य आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यात आतापर्यंत 81 लाख 39 हजार 466 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 15 लाख 95 हजार 381 नमूणे सकारात्मक आले आहेत. सद्यस्थितीस राज्यात 24 लाख 12 हजार 921 जण गृहविलगीकरणात आहेत. तर, 23 हजार 384 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाची साथ सर्वोच्च सीमेवर आहे. आता कोरोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल.

फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘संडे संवाद’ या कार्यक्रमात याबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.