Maharashtra Corona Update : राज्यात 79,093 सक्रिय रुग्ण; आज 7,863 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 7 हजार 863 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात सध्या 79 हजार 093 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 20 लाख 36 हजार 790 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 6 हजार 332 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89 टक्के झाले आहे.

दरम्यान, पुण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. आज पुण्यात 6 हजार 124 चाचण्या झाल्या त्यात 688 नवीन रुग्णांची वाढ झाली तर, 498 रुग्ण बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात सध्या 5 हजार 091 रुग्ण उपचाराधिन घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.