Maharashtra Corona Update : आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट, सक्रिय रुग्ण एक लाखाहून कमी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. राज्यात आज 6 हजार 017 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 13 हजार 051 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाहून कमी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 20 हजार 207 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 93 हजार 401 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 96.35 टक्के एवढं झाले आहे.

महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाहून कमी झाली असून, सध्या 96 हजार 375 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 66 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 27 हजार 097 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 56 लाख 48 हजार 898 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 61 हजार 796 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 052 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.