Pimpri News: औद्योगिकनगरीत महाराष्ट्र दिन, कामगार दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत महाराष्ट्र दिन, कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य स्थापनदिनानिम्मित पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, सतीश इंगळे, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उप आयुक्त संदीप खोत, मनोज लोणकर, अजय चारठाणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सुषमा शिंदे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त शहरवासीयांना, कामगार दिनानिमित्त शहरातील कामगार बंधू भगिनींना तसेच येणाऱ्या रमझान ईद , अक्षय तृत्तीया या सणांनिमित्त सर्वांना आयुक्त पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी,सांस्कृतिक तसेच क्रीडानगरीचे शहर म्हणून देशात ओळखले जाते. त्याअनुषंगाने शहराचा देशपातळीवर नावलौकिक वाढविण्याच्या दृष्टिने यशस्वीरित्या प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त थेरगाव ग प्रभाग येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. शिबिराचे उद्घाटन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, प्रभाग अधिकारी रविकिरण घोडके, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसंलगी, रक्तपेढी सहाय्यक किशन गायकवाड, कार्यकरी अभियंता देवण्णा गट्टुवार, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते. सुमारे 64 बाटल्या रक्त रक्तपेढीत जमा झाले असल्याची माहिती डॉ. मोसलगी यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.