Pimpri News : ‘नृत्यतरंग’च्या सुंदर नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

 एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडमधील 20 नृत्य संस्थांमधील एकूण 150 कलाकारांचा सहभाग आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 कलाकारांनी एकत्रितपणे प्रस्तुत केलेली ‘वंदे मातरम्’ ही नृत्यरचना यामुळे पिं चिं मधील रसिक मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते काल झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे. संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीने आयोजित केलेला ‘नृत्यतरंग’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात अतिशय उत्साहाने पार पडला. 

या अनोख्या नेत्रदीपक कार्यक्रमात कथक, भरतनाट्यम्,ओडिसी,मोहिनी अट्टम या चार नृत्य प्रकारातील सुंदर सामूहिक रचना प्रस्तुत झाल्या. भरतनाट्यम् मधील पुष्पांजली,शब्दम तिल्लाना,या पारंपरिक रचना व शिवा वरील चंद्रचूड,दुर्गाचालीसा, कालिंग नर्तन तिल्लाना या रचना प्रस्तुत झाल्या. भरतनाट्यम् आणि मोहिनी अट्टमची सुरेख जुगलबंदी प्रस्तुत झाली.

सामाजिक समस्येवर भाष्य करणारी ‘गंगा तुम बेहेती हो क्यू’ ह्या प्रभावी रचनेस रसिकांनी विशेष दाद दिली. कथक नृत्य शैली मधील  शिव धृपद , त्रिवट, तराणा , नटराज स्तुती, अशा पारंपरिक रचनाबरोबरच तंदानु, मधुरशष्टकम , श्रीकृष्ण निरतत ,पायलिया, सरगम, फ्युजन संगितावरील रचना, राम भजन या रचना फारच सुंदर सादर झाल्या.

कथक ,भरतनाट्यम्, ओडिसी व मोहिनी अट्टम या नृत्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम्’ या गाण्यावर 75 कलाकारांनी केलेली सुंदर नृत्य प्रस्तुती म्हणजे कार्यक्रमाचा परमोच्च क्षण होता.यातील प्रत्येक नृत्यशैलीचा आविष्कार अतिशय अप्रतिम होता.

पिंपरी चिंचवड शहरामधील सायली काणे -कलाश्री नृत्यशाळा पायल गोखले – पायल नृत्यालय,वरदा वैशंपायन – नृत्योपासना,डॉ. सुमेधा गाडेकर – नुपूर नृत्यालय,शिल्पा भोमे- नटेश्र्वर नृत्यकला मंदिर,सरिता माहुरे – नृत्य साधना , भावना गौड -वर्णिका नृत्यालय ,शोभा पवार व विद्यार्थीनी – कलांगण ,वर्षा अनंतरामन ,स्नेहल सोमण – नृत्य शारदा कथक कलामंदिर,अमृता गणेश व विद्यार्थीनी – नुपूरनाद,डॉ. गौरी काळे – नृत्यमंजिरी ,अनुजा वैशंपायन,सौ.अदिती घुमरे- नृत्यरंग,राजश्री धोंगडे – संचय कथक नृत्यालय ,श्रद्धा देवकर- पदन्यास कथक नृत्यालय,अंकिता भाटे – श्रेया नृत्यकला मंदिर,प्रमोदीनी तापकिरे व विद्यार्थीनी – नटेश्वर नृत्य अकॅडमी,गौरी फडके व राधिका देशपांडे – कलानंद ,गंगा – सुवर्णा बाग -कलासाधना,सायली देवधर -नृत्यार्पण, सुहिता कृलकर्णी, सुरभी घोडेकर या 20 नृत्यसंस्थांचा समावेश या नृत्यतरंग कार्यक्रमात होता.

नृत्यतरंग या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कारभारती पश्चिम प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, विख्यात भरतनाट्यम् गुरू डॉ. स्वातीताई दातार, डॉ मीनल कुलकर्णी, अभय पटवर्धन, मैत्रयी बापट उपस्थित होत्या.

देशात अभिजात कला रुजविण्याचे महत्वाचे काम संस्कार भारती करत असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी आवर्जून नमूद केले. डॉ.स्वातीताई दातार यांनी सर्वांना नृत्य दिनाच्या दिलेल्या शुभेच्छापर मनोगतात अभिजात नृत्यकला शिकण्या बाबत व त्या प्रस्तुत करण्या बद्दल आजचे सध्याचे चित्र खूपच आशादायी असल्याचे मत व्यक्त केले.

भरतनाट्यममध्ये नुकतीच पीएचडी संपादन केल्याबद्दल नृत्यांगना डॉ. मीनल कुलकर्णी यांचा संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.या सत्कारा बद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे संस्कार भारतीशी जुने ऋणानुबंध असल्याचे त्यांनी सांगितले. अभिजात नृत्य कलांचा ग्रामीण भागातही प्रसार व प्रचार व्हावा याबद्दलची तळमळ आणि त्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे मनोगत व्यक्त केले.

नृत्यांगना सुवर्णा बाग, प. प्रांत. प्राचीन कला विधा सहसंयोजक विनिता ताई देशपांडे, प.प्रांत साहित्य विधा संयोजक विशाखा कुलकर्णी, यांची सन्माननीय उपस्थिती होती. पिं .चिं.अध्यक्ष सचिन काळभोर, उपाध्यक्ष हर्षद कुलकर्णी, सचिव लीना आढाव, नृत्यविधा प्रमुख वरदा वैशंपायन,सहविधा प्रमुख स्नेहल सोमण यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

संस्कारभारती ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. संगीतविधा कलाकार स्वरेषा पोरे,वैशाली आलूरकर, शर्मिला शिंदे,रागिणी कौसडीकर,यांनी हे ध्येयगीत सादर केले,त्यांना तबल्याची साथ निलेश शिंदे यांनी केली होती. साहित्यविधा प्रमुख प्रणिता बोबडे, सहविधाप्रमुख शुभांगी दामले यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन केले. नाट्यविधा प्रमुख किरण येवलेकर, चित्रकला विधा प्रमुख प्रफुल्ल भिष्णुरकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.सचिव लीना आढाव यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.