Chikhali News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) दुपारी ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.

पूजा गणेश हाके (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश पांडुरंग हाके (वय 28), सासू, नणंद, चूलत सासरा शिवाजी केरबा हाके (वय 41), मावस दिर ओमकार गोविंद देवकाते (वय 25), मावस सासरा पांडुरंग विश्वनाथ देवकाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सासरी नांदत असताना आरोपींनी तिच्याकडे गाडी, फ्रीज घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पूजाने शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.