Maharashtra : धनगर आरक्षणासाठी अभ्यासगटाची स्थापना

एमपीसी न्यूज – धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (Maharashtra) आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने इतर राज्यातील याबाबतच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. नऊ सदस्यांचा हा अभ्यासगट मध्यप्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यांचा अभ्यास करून तीन महिन्याच्या आत अहवाल शासनाला सादर करणार आहे.

या अभ्यास गटात दे आ गावडे (सह सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई) हे सदस्य सचिव तथा विभागाचे प्रतिनिधी असतील. संतोष गावडे (उप सचिव महसूल विभाग, मंत्रालय मुंबई), धनंजय सावळकर (अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) महानिर्मिती, मुंबई), जगन्नाथ वीरकर (अप्पर जिल्हाधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांचे विशेष कार्य अधिकारी) हे तीन शासकीय सदस्य असतील. त्यासोबत जे बी बघेळ, अॅड. एम ए पाचपोळ, माणिकराव दांडगे पाटील, जी बी नरवटे हे चार अशासकीय सदस्य असणार आहेत.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याविषयी 21 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली. (Maharashtra)

Pimpri : क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून महिलेला बॅटने मारहाण

त्यात मध्य प्रदेश, बिहार व तेलंगणा या राज्यांनी त्यांच्या अधिकारात त्या राज्यांतील जातनिहाय यादीत समावेश असलेल्या जाती, जमातींना कोणत्या निकषांच्या आधारे जात प्रमाणपत्र व अन्य लाभ दिले आहेत. त्याचा अभ्यास हा अभ्यासगट करणार आहे.

या राज्यांनी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अवलंबलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे. मध्य प्रदेश, बिहार व तेलंगणा या राज्यांनी संविधानातील अथवा त्या राज्यांच्या कायद्यातील ज्या तरतुदींचा आधार आरक्षण, लाभ देताना घेतला त्याबाबतचे अभिलेख, कागदपत्रे उपलब्ध करून घेतली जाणार आहेत. तसेच काही न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याबाबतची माहिती, कागदपत्रे, दस्तऐवज हा अभ्यासगट जमा करणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.