Maharashtra : नोटरी वकिलांची यादी लवकर प्रसिद्ध करा व वकील संरक्षण कायदा केंद्रीय स्थरावर लागू करा ; महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनची मागणी

एमपीसी न्यूज : – महाराष्ट्रतील नोटरी वकिलांची मुलाखत (Maharashtra )होऊन 1 वर्ष झाले. तरी देखील नोटरी वकिलांची यादी जाहीर होत नाही या संदर्भात अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री भारत सरकार यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यादी लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन चे वतीने करण्यात आली.

यावेळी कायदेशीर टेक्निकल अडचणी मुळे यादी (Maharashtra )होण्यास विलंब झाला आहे .लवकरात लवकर यादी जाहीर करण्यात येईल या बाबत अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री यांनी आश्वासन दिले.

Pimpri :केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांची डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

राहुरी येथे ऍड.आढाव दाम्पत्याचा झालेला निर्घृण खून बाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.असेच जर कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलांचे जर खून पडत राहिले तर न्यायालयात न्याय मिळविणे कठीण होऊन बसेल असे सांगून वकील संरक्षण कायद्याची मागणीचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले .

निवेदनावर बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा चे उपाध्यक्ष ऍड.राजेंद्र उमाप, नोटरी असो चे अध्यक्ष ॲड.आतिश लांडगे ,पिंपरी चिंचवड ॲड. बार असो चे अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले, नोटरी असो.चे प्रदेशाध्यक्ष ॲड.सय्यद सिकंदर अली यांनी सही केली.यावेळी अमर साबळे ( मा.राज्यसभा खासदार )यांनी वारंवार वकीलांवर होणाऱ्या हल्ल्या वर मंत्री अर्जुन राम मेघवाल समोर चिंता व्यक्त करून वकील संरक्षण कायदा हा केंद्रीय कायदा करून संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी केली .

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share