Maharashtra Rain : सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यभरात (Maharashtra Rain) विश्रांती घेतली आहे. मात्र त्यामुळे शेतातील पिकांना ओढ बसली आहे. तर शहरपरिसरात पाणीपुरवणा करणारी धरणे देखील गळ्याशी येऊन थांबली आहेत.

सर्वांनाच आता पुन्हा पावसाची ओढ लागली आहे. अशातच हवामान खात्याने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन अठवड्यात चांगाला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला असून शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे असाही सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.

मात्र ऑगस्टच्या उर्वरीत दिवसात पाऊस नाही असेही सांगण्यात आले आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या (Maharashtra Rain) माहितीनुसार, राज्यात पेरण्या जूनच्या अखेरीस झाल्या. कारण जूनमध्ये अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता.

अनेक शेतकऱ्यांची पिके वर आली आहेत. मात्र, पिकांना पाणी मिळत नाहीये. या पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आवाहन आहे की, काही भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस असण्याची शक्यता आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची स्वत:हून शेततळे किंवा इतर माध्यमातून नियोजन करावं’.

राज्यात सात टक्के तुटीचा पाऊस. त्याचबरोबर पुढील दहा दिवस पावसाचे कोणत्याही प्रकारचे तीव्र इशारे नाहीत. पुढील आठ-दहा दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या काळात पावसाची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 25 टक्क्यांनी कमी पाऊस पडला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

Maharashtra : आता दहावी, बारावीच्या परीक्षा वर्षांतून दोनदा, एनसीईआरटीचा निर्णय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.