PCMC : महापालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात मोठे फेरबदल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात आयुक्त शेखर सिंह यांनी मोठे फेरबदल केले आहेत. (PCMC) उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सह आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार दिला. तर, प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना या विभागाचे प्रमुख म्हणून घोषित केले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना महापालिकेत रुजू होऊन नऊ महिने पूर्ण झाले. आयुक्तांना प्रशासनाचा चांगला अंदाज आला आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त सिंह  यांनी गुरुवारी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले.  उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सह आयुक्त पदाचा पदभार देत त्यांच्याकडे कायदा विभागासह आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. आकाशचिन्ह व परवाना, पशुवैद्यकीय, करसंकलन विभागा काढून घेत उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे भूमी आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण अतिक्रमण निर्मुलन विभाग सोपविला. उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी दिली आहे. उद्यान विभाग काढून घेत उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे केवळ कामगार कल्याण विभाग ठेवला. तर, अजय चारठणकर यांच्याकडील आरोग्य काढून घेत समाज विकास विभाग सोपविला आहे.

मध्यवर्ती भांडार कायम ठेवत मनोज लोणकर यांच्याकडे क्रीडा विभाग सोपविला. शिक्षण विभाग काढत उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे पशुवैद्यकीय विभाग नव्याने सोपविला आहे.(PCMC)  माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे नव्याने उद्यान विभाग दिला. सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडील झोनिपू काढत ह क्षेत्रीय कार्यालय दिले.

Alandi : मरकळ चौकात आळंदी पोलिसांची मॉक ड्रील

क्रीडा, माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्राचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे केवळ निवडणूक व जनगणना विभाग कायम ठेवला. भूमि आणि जिंदगी काढत प्रशांत जोशी यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना, नीलेश देशमुख यांच्याकडे कर संकलन विभाग कायन ठेवला. सोनम देशमुख यांच्याकडे प्रशासन अधिकारी, स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी दिली. क क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी कायम ठेवत अण्णा बोदडे यांच्याकडे  झोनिपु विभाग दिला.

उमाकांत गायकवाड यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयासह स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग दिला. अतिक्रमण निर्मूलन काढून घेत राजेश आगळे यांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी कायम ठेवली. ह क्षेत्रीय कार्यालय काढून घेत विजय थोरात यांच्याकडे अग्निशमन कायम ठेवला. (PCMC) त्यासोबत शिक्षण विभागाची जबाबादारी दिली. स्वच्छ सर्वेक्षण कामाकाजासाठी समन्वयक असलेले आणि दोन महिन्यांपासून रजेवर असलेल्या विनोद जळक यांच्याकडे आरोग्य विभाग सोपविला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.