Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘मेकवेव्हज २२’ संपन्न

एमपीसी न्युज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी), येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात ‘मेकवेव्हज २२’ नुकताच पार पडला.

या कार्यक्रमा अंतर्गत, राज्यपातळीवरील यंत्र अभियांत्रिकी पदविका प्रकल्प सादरीकरण स्पर्धा, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि प्रॉडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट या दोन सेंटर ऑफ एक्सेलन्सचे उदघाटन झाले. मॅचवेल इंजिनिरिंग प्रा. लि.,लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजी, इंडिया फर्स्ट रोबोटिक्स इनोव्हेशन अँड रिसर्च, ऑटोमेक रोबोटिक्स या मेकॅनिकल इंजिनिअरिंग उद्योगसंस्थांसोबत सामंजस्य करार, मेकॅनिकल विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या 25 कॉपीराईटची नोंदणी असे विविध उपक्रम पार पडले. यातील राज्यपातळीवरील यंत्र अभियांत्रिकी पदविका प्रकल्प सादरीकरण या राज्यस्तरीय स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात राज्यभरातून विविध डिप्लोमा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Pune chandani chowk : चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

याप्रसंगी उदघाटन कार्यक्रमात प्रा. मंगेश काळे यांनी प्रास्ताविक केले. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. नितीन शेरजे यांनी मेकॅनिकल विभागातल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एनएमआयटीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी महाविद्यालयाचा निकाल व रोजगार संधी याबद्दल माहिती दिली व उद्योगजगतातील सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुजित परदेशी चेअरमन यंत्र अभियांत्रिकी बोर्ड ऑफ स्टडीज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून टोवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लि. चे बिझनेस हेड प्रशांत साळुंखे व सीओईपी च्या भाऊ इन्स्टिट्यूट चे असिस्टंट जनरल व्यवस्थापक गिरीश देगावकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सेलन्स चे उदघाटन झाले. प्रा. मनोजकुमार काटे यांनी आभार मानले. कार्यक्रम सूत्रसंचालन खैरुनिसा अत्तार व मृण्मयी गद्रे यांनी केले. स्पर्धा-कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मंगेश काळे यांनी विशेष प्रयत्न केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन, संचालक व प्राचार्य यांनी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.