Manchar : मोदींची वर्तणूक नव्या नवरीसारखी, काम कमी आणि बांगड्याचाच आवाज जास्त – धनंजय मुंढे

एमपीसी न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्तणूक नव्या नवरीसारखीच, काम कमी आणि बांगड्याचाच आवाज जास्त, असे सांगत सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.  मंचर येथील सभेत ते बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.
मुंढे म्हणाले, नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की नवीन सुनबाई खूप काम करतेय. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.