Bollywood News : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा झळकणार बॉलीवूड चित्रपटात

एमपीसी न्यूज: मराठी अभिनेत्री सई अभिनेत्री ही आता पुन्हा बॉलीवूड चित्रपटात काम करायला सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात सई दिसणार आहे.

2020 मध्येच या चित्रपटाची घोषणा करण्यात करण्यात आली होती. आता या चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. सईबरोबर या चित्रपटात श्वेता बसू, प्रतिक बब्बर, अहाना कुमरा, प्रकाश बेलवाडी हे मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सईने ट्विट करत दिली आहे.

हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित असणार आहे. तसेच या चित्रपटाची मांडणी ही वेगळ्या धाटणीची असू शकते, असा तर्कही समाजमाध्यमांवर व्यक्त होताना दिसत आहे. यापूर्वी सईने बॉलीवूडमधील गजनी, सोलो, हंटर अशा चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.