Pune : सराईत गुंड पिस्टलासह जेरबंद

दरोडा प्रतिबंधक पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – कोथरूड पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील गुंडाला दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पिस्टल व काडतूसासह ताब्यात घेतले आहे. 

अक्षय ठेंबे (वय 24, रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस नाईक सचिन अहिवळे यांना खब-याकडून माहिती मिळाली होती की, कोथरूड पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील गुंड अक्षय ठेंबे हा कोथरूड येथील भुसार कॉलनीमध्ये येणार आहे व त्याच्याजवळ अवैध गावठी बनावटीचे पिस्टलदेखील आहे.

त्यानुसार पोलिसांनी खब-याने सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचून अक्षय ठेंबेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक राऊंड, असा एकूण 40 हजार 200 रुपये किमतीचा माल जप्त केला.
अक्षय ठेंबेविरूद्ध याआधी कोथरूड पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे व त्याने शस्त्र खरेदी का केले याचा तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.