PCMC School : ‘माता लीडर उपक्रमाअंतर्गत’ तज्ञांचे व्हिडीओ विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविणार

एमपीसी न्यूज – मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली. याच अभियानांतर्गत माता-पालकगट स्थापन केले गेले आहेत. (PCMC School) यामाध्यमातून महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांचे व्हिडीओ बनवून संबंधित पालकांच्या मोबाइलवर पाठविण्यात येणार आहेत. माता लीडर उपक्रमात मुलांनी घरी काय केले पाहिजे, त्यांचा अभ्यास कसा घ्यावा, हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली. याच अभियानांतर्गत माता-पालकगट स्थापन करण्याच्या सुचना पालिकेच्या शिक्षण विभागाला केल्या होत्या. त्याचबरोबर शिक्षकांना देखील इयत्ता 1 ली ते 3 रीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सूचविले आहे. परंतू, तेवढ्याने मुले निपुण होणार नाहीत. त्यामुळे शासन आदेशानुसा पालिकेच्या शिक्षण विभागाने माता-पालक गटाची स्थापना केली आहे.

MTDC : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन पर्यटकांसाठी दिपोत्सवाची अनोखी पर्वणी….

महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांचे व्हिडीओ बनवून संबंधित पालक गटांना पाठविण्यात येणार आहेत. पालकगट मातांच्या मोबाइलवर व्हिडीओ पाठविणार आहे. माता लीडर उपक्रमात मुलांनी घरी काय केले पाहिजे, त्यांचा अभ्यास कसा घ्यावा, मुलांचा अभ्यासासाठी काय आयडिया वापराव्यात, हे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ सांगणार आहेत. आयडिया व्हिडिओ दर आठवड्याला पालकांना पाठविण्यात येणार आहेत.(PCMC School) हे व्हिडीओ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेमध्ये असणार आहेत. दर आठवड्याला येणारे हे व्हिडिओ आपल्या गटातील मातांना पालकगटांनी दाखवणे बंधनकारक आहे. व्हिडिओमध्ये दाखविलेल्या कृती व अभ्यास, आपल्या गटातील मातांकडून करून घ्यावा लागणार आहे.

शिक्षणाधिकारी  संजय नाईकडे म्हणाले, ”शासनाच्या आदेशाप्रमाणे महापालिका शाळांमध्ये पालकगटाची स्थापना करण्यात येत आहे. (PCMC School) हे पालकगट सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना संबंधित विषयांचे व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडून अभ्यास, कृती करून घेणार आहेत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.