Maval : राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छ व स्वस्थ भारत श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. डी वाय पाटील एज्युकेशन अकॅडेमी,मुंबई संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय (आंबी ता.मावळ) यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवार (दि.26) ते शुक्रवार (दि.1) दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप झाला.

सदर शिबिरामध्ये महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मंदिर, शाळा, स्मशानभूमी तसेच तळ्याजवळील परिसर, अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४८ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन पिंपरी येथील ब्लड बँकेने केले.

विविध वैचारिक व्याख्यानातून स्वयंसेवक व ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी मावळ तालुका गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, कार्यक्रम अधिकारी प्रा.सुधीर शिंदे, प्रा. सुधाकर निंबाळकर, प्रा.धाकुळकर, प्रा.खेडकर, प्रा.चौगुले, प्रा.जाधव मुख्याध्यापक विजय चव्हाण, किरण कोतुळकर,संग्राम गायकवाड स्वयंसेवक व बहुसंख्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

सूत्रसंचलन सिद्धेश चव्हाण व अपूर्वा सावंत यांनी केले. आभार प्रा.सुधीर शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.