Maval Corona Update: मावळ तालुक्यात रविवारी कोरोनाचे 55 नवे रुग्ण

55 new corona patients in Maval taluka on Sunday तळेगाव शहरात 15, लोणावळा शहरात 30 आणि वडगावमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (दि.30) कोरोनाचे 55 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 963 झाली आहे. तर दिवसभरात 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण नवलाख उंबरे (पुरुष, 48 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 47 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 8 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये वराळे, वाकसाई येथील प्रत्येकी दोन, माळवाडी, कामशेत, सुदुंबरे, काले येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 15, लोणावळा शहरात 30 आणि वडगावमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.

एकूण 1 हजार 963 रुग्णांमध्ये सध्या 487 रुग्ण सक्रिय आहेत. तर 1 हजार 399 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 677, लोणावळा नगरपरिषद 246 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 128 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 912 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.