Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 93 जणांना डिस्चार्ज; 54 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली असुन रुग्ण बरे  होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. मावळ तालुक्यात रविवारी (दि. 6) 54 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 93 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एक रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली असुन, आतापर्यंत 445 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 729 आहे.

शहरी भागात 21 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22427 झाली आहे. तर दिवसभरात 93 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात मोहितेवाडी व धामणे प्रत्येकी 5, कान्हे 4, इंदोरी व सोमाटणे प्रत्येकी 3, साळुंब्रे, नवलाख उंब्रे, कुसवली व परंदवडी प्रत्येकी 2, वाडीवळे, कामशेत, गोडुंब्रे, वराळे व वाकसई प्रत्येकी 1 असे एकूण 41 रुग्ण सापडले.

21253 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7225, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3866 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1156 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12247 रुग्ण तर ग्रामीण भागात 10180 रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.77 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 166 लोणावळा नगरपरिषदमध्ये 90 वडगाव नगरपंचायत मध्ये 33 व ग्रामीण भागात 440 असे एकूण 729 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.