Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 95 नवीन रुग्ण; 90 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 23) कोरोनाचे 95 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 107 झाली आहे. तर दिवसभरात 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तळेगाव (पुरुष, 66 वर्ष), कुसगाव बुद्रुक (पुरुष, 79 वर्ष), जांबवडे (पुरुष, 62 वर्ष), इंदोरी (पुरुष, 53 वर्ष), कांब्रे आं मा (महिला, 67 वर्ष) येथील पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 72 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 23 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 29, लोणावळा शहरात 38 आणि वडगाव शहरात 5 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 107 रुग्णांमध्ये सध्या 933 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 252, लोणावळा नगरपरिषद 880 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 252 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 723 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

बुधवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये चांदखेड 4, वराळे 3, इंदोरी 3, सुदवडी, कांब्रे ना मा, सळूम्बरे, काले, राजपुरी, घोणशेत, उर्से, सोमाटणे, ब्राह्मणवाडी (साते), जांभवडे, गोवित्री, कांब्रे आं मा, तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 60 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 10 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 70 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.