Maval Corona Update : दिवसभरात तालुक्यातील तब्बल 917 रुग्ण कोरोनामुक्त! 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असुन रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे. मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 31) 121 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असुन, आतापर्यंत 440 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

714 गृह विलगीकरण रुग्णांनी कोरोनावर मात केली असुन 203 रुग्ण बरे होऊन एकूण 917 घरी गेले आहेत. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 833 आहे.

शहरी भागात 79 तर ग्रामीण भागात 42 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 61 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 14 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22020 झाली आहे. तर दिवसभरात 203 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात साळुंब्रे 6, वराळे 6, साते 5, कामशेत, नवलाख उंब्रे व तळेगाव दाभाडे ग्रामीण प्रत्येकी 3, आंबी, चांदखेड, गहूंजे, इंदोरी व माळवाडी प्रत्येकी 2, आंबळे, नाणे, नानोली तर्फे चाकण, सुदवडी, उर्से व वाडीवळे प्रत्येकी 1असे एकूण 41 रुग्ण सापडले.

20747 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 440 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7120, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3836 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1137 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12093 रुग्ण तर ग्रामीण भागात 9927 रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.22 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 202 लोणावळा नगरपरिषदमध्ये 115 वडगाव नगरपंचायत मध्ये 37 व ग्रामीण भागात 479 असे एकूण 833 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.