Maval Corona Update : मावळात 47 नवीन रुग्णांची नोंद; 41 जणांना डिस्चार्ज, 3 रुग्णांचा मृत्यू

आजपर्यंत तालुक्यात कोरोनामुळे एकूण 62 रुग्ण दगावले आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज, शनिवारी कोरोनाच्या 47 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 655 झाली आहे. तर दिवसभरात 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात कोरोनामुळे एकूण 62 रुग्ण दगावले आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील सर्वाधिक 29 रुग्णांचा समावेश आहे. तर तालुक्याच्या शहरी भागात एकूण 18 रुग्णांची नोंद झाली.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदोरी येथे 13, कामशेत येथे 6 सुदुंबरे येथे 4 आणि धामणे, येळसे, बेबेडओहोळ, कशाल, तळेगाव दाभाडे ग्रामीण आणि नवलाख उंबरे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

शहरी भागातील तळेगाव नगर परिषद हद्दीत 11 लोणावळा नगर परिषद हद्दीत 7 रुग्णाची नोंद झाली आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

आजपर्यंत आढळलेल्या एकूण 1655 रुग्णांमध्ये शहरी भागातील 850, तर ग्रामीण भागातील 805 रुग्णांचा समावेश आहे. सध्या 348 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 245 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 545, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 185 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 120 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 805 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.