Maval : दिनेश ठोंबरे यांची पुणे जिल्हा युवा सेना सरचिटणीस पदी निवड

एमपीसी न्यूज – शिव वंदना ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिनेश ठोंबरे ( Maval ) यांनी नुकताच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुणे जिल्हा युवा सेना सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.

Pune : पात्र मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

शिव वंदना ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांचा नुकताच युवासेना शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश झाला असून आजपर्यंतची त्यांची महाराष्ट्रभर शिवकार्याची दखल घेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघटनेसोबत पक्षाची जोड असावी या भूमिकेवर त्यांनी युवा सेनेवर विश्वास ठेवत प्रवेश केला असून शिवसेना पक्षाने याची दखल घेत त्यांच्यावर पुणे जिल्हा युवा सेना सरचिटणीस पदी निवड करून पुढील काळात युवा सेनेला एक ताकद मिळेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून समाजकार्य शिवकार्य आणि हिंदुत्वासाठी एक नवीन चेहरा युवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

शिवसेना युवासेना पक्षात प्रवेश झाला असून शिववंदना संघटना आणि युवा सेना या दोन्ही जबाबदारी सोबत ठेवून महाराष्ट्रभर शिवकार्य आणि युवा सेना घराघरात पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करत राहील असेही दिनेश ठोंबरे यांनी सांगितले ( Maval ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.