Maval : तालुक्यात सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी घेतली क्रिडा मंत्र्यांची भेट

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी मागील तीन वर्षांपासून (Maval) आमदार सुनिल शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी (दि. 9) भेट घेतली. क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, याबाबतचे निवेदन आमदार शेळके यांनी क्रीडा मंत्र्यांना दिले.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त करता यावा या उद्देशाने शासनाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ हे धोरण राबविले होते.परंतु मावळ तालुक्यात संकुल उभारण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नव्हती.परंतु सुनिल  शेळके आमदार झाल्यावर त्यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला आहे.याबाबतीत अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता.जांभुळ गावाजवळ क्रिडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली (Maval) होती.

 

Alandi : आळंदीमध्ये डोळे लागण रुग्ण संख्येत घट; नविन रुग्ण संख्या 92

 

मावळ तालुक्याला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा असून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. तालुक्यातून अनेक युवा खेळाडुंनी विविध क्रीडाप्रकारात चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळविलेला आहे.क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत यश मिळविण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणा अभावी ग्रामीण भागातील मुलांना विविध (Maval) स्पर्धांना मुकावे लागते.

 

क्रीडा क्षेत्रातील कौशल्य असुनही केवळ अद्ययावत व सुसज्ज क्रिडासंकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळांडुना देखील अडचणी येत आहेत. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन अद्ययावत व सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहिल्यास खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील.

 

मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करुनही अद्याप ठोस निर्णय झाला नाही.तरी मावळ तालुक्यात क्रिडा संकुल उभारणे कामासंदर्भात क्रिडा मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन व्हावे,अशी विनंती मंत्र्यांकडे केली असून लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल,असे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले आहे.अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी (Maval) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.