Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंटर ॲक्टीव्ह डिजिटल स्मार्ट बोर्डचे उद्घाटन

कृष्णराव भेगडे, मंगला काकडे यांच्या वाढदिवसा निमित्त राबविला उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी (Talegaon Dabhade) आमदार कृष्णराव भेगडे व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मंगला काकडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंटर ॲक्टीव्ह डिजिटल स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शाळेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेचे संचालक सुभाष दाभाडे, सचिव प्रशांत शहा, खजिनदार गौरी काकडे, सुप्रिया काकडे, सोनल काकडे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी कृष्णराव भेगडे व मंगला काकडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंटर ॲक्टिव्ह डिजिटल स्मार्ट बोर्डचा उद्‌घाटन सोहळा पार पडला.

Maval : तालुक्यात सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी घेतली क्रिडा मंत्र्यांची भेट

इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व वर्गात हे स्मार्ट बोर्ड लावण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन व शिक्षकांच्या अध्यापन क्रियेत सुलभता येण्यात या डिजिटल स्मार्ट बोर्डचा उपयोग होणार आहे. तसेच प्रत्येक विषया संदर्भात त्वरीत माहिती उपलब्ध होईल. मावळातील पूर्ण डिजिटल स्वरूपातील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल ही पहिली शाळा आहे. या डिजिटल स्मार्ट बॉर्डचा विध्यार्थ्यांना शिक्षणात लाभ होईल. असे शाळेचे अध्यक्ष संदीप काकडे म्हणाले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी सद्य स्थितीत डिजिटल स्मार्ट बोर्डचे शिक्षणातील महत्त्व सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील दोन विद्यार्थ्यांचाही केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी (Talegaon Dabhade)  उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.