Maval News: पवना धरण 98 टक्के भरले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन

या वर्षी धरण 98 टक्के भरल्याने व पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आसल्याने आज धरणातून 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

एमपीसी न्यूज – पवना धरण 98 टक्के भरले असून सततच्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा 100 टक्के होईल या पार्श्वभूमीवर आज (दि.30) खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते धरणाचे 6 दरवाजे उघडून 2200 क्युसेक पाणी सोडण्यात आले.

या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, भारत ठाकूर, अमित कुंभार, शांताराम भोते, उमेश दहीभाते उपस्थित होते.

राज्यातील व पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरले असून या वर्षी पवना धरण उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज धरणाचे 6 दरवाजे उघडून 2200 क्युसेक पाणी पवना धरणातून सोडण्यात आले. तसेच पवना धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

पवना धरणाची पाणीसाठा क्षमता 8.51 टीएमसी असून त्यातील 6.50 टीएमसी पाणी पिंपरी चिंचवड शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी वापरले जाते.

या वर्षी धरण 98 टक्के भरल्याने व पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आसल्याने आज धरणातून 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून पवना नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.’

पवना नदीपात्रा लगत असणाऱ्या गावांना तसेच शेतीलाही पवना धरणातील पाण्याचा पुरवठा होतो. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पिंपरी-चिंचवड शहराची पाणी समस्या दूर झाली आहे, असे खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.