Maval News : अजिवली गावातील घारे वस्ती येथील रस्त्याचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात अजिवली गावच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या घारे वस्ती येथील रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच नवनिर्वाचित सरपंच सचिन शिंदे व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच येथील वस्तीवर आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून काँक्रेटीकरण रस्ता मंजूर झाला असून, अनेक वर्ष मावळ तालुक्यात इतर राजकीय पक्षांची सत्ता येऊन गेली परंतु कोणीही रस्त्याच्या कामासाठी घारे वस्ती कडे फिरकले नाही. आमदार सुनील शेळके यांनी पहिल्याच वर्षी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवून दिल्याने व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

घारे वस्तीही अजिवली डोंगराच्या पायथ्याला असल्याने याठिकाणी चारचाकी वाहन जात नव्हते,त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थी तसेच दूध व्यावसायिक यांना वर्षानुवर्षे पायपीट करत जावे लागत होते.लहान मुले महिला तसेच वृद्धांना रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत होता हीच अडचण लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवून दिली व आज भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच सचिन शिंदे, उपसरपंच रुपाली अंकुश लायगुडे, सदस्य छाया गोणते, अमोल गोणते, माजी सरपंच सुनील ओव्हाळ, हनुमंत लाला गोणते, आत्माराम लायगुडे, अनंता लायगुडे, नारायण मालपोटे, संतोष कडू, विनायक केदारी, खंडू घारे, गणपत घारे, गबळू घारे, किसन घारे, भाऊ घारे, धनाजी घारे, तानाजी लायगुडे, पांडुरंग शिर्के, बिबाबाई लायगुडे, काळू उंबरकर, अंकुश लायगुडे, अनिल लायगुडे, राजू लायगुडे, लहू लायगुडे, बबन लायगुडे, बबन राऊत, शंकर लायगुडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.