Maval News : पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्याच्या संदर्भातील हरकती शेतकऱ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत नोंदवाव्यात – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रारुप विकास आराखडा बनविण्यात आला आहे. या आराखड्यातील रस्ते, पुररेषा तसेच झोन संदर्भात तालुक्यातील स्थानिकांना काही हरकती, सुचना असल्यास त्यांनी 30 ऑगस्टपर्यंत आपल्या हरकती वडगाव मावळ येथील जुन्या पंचायत समिती इमारतीतील पीएमआरडीएच्या कार्यालयात द्याव्यात,  असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी पीएमआरडीए आराखड्यातील बाधित शेतकऱ्यांना केले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रारुप विकास आराखडा बनविण्यात आला आहे. या आराखड्यातील रस्ते,पुररेषा तसेच झोन संदर्भात तालुक्यातील स्थानिकांना काही हरकती,सुचना असल्यास त्यांनी 30 ऑगस्टपर्यंत आपल्या हरकती वडगाव मावळ येथील जुन्या पंचायत समिती इमारतीतील पीएमआरडीएच्या कार्यालयात द्याव्यात. 30 ऑगस्टपर्यंत जे नागरिक हरकती देतील, त्यांच्या हरकती विचारात घेऊन त्यावर पुढे सुनावणी घेण्यात येणार आहे.

यामुळे नागरिकांनी कोणतेही दलाल, एजंट यांच्याकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता वडगाव येथील कार्यालयात जाऊन आपापल्या हरकती नोंदवाव्यात. असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी सोमवारी पीएमआरडीए आराखड्यातील बाधित शेतकऱ्यांना केले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बनविण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्या संदर्भात मावळ तालुक्यातील अनेक नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी व नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेण्यासाठी वडगाव मावळ येथे पीएमआरडीए क्षेत्रीय कार्यालय देखील सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.