Maval News : आंदर मावळात जाणाऱ्या रस्त्याचे पट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे – चंद्रकांत ससाणे

एमपीसी न्यूज – कान्हे फाटा येथुन आंदर मावळात जाणाऱ्या रस्त्याचे साईट पट्ट्यांचे काम चालू असुन त्या पट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ससाणे यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन वडगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले असून निवेदनात म्हटले आहे की कान्हे फाट्यापासुन आंदर मावळात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईट पट्ट्यांची कामे चालू आहेत. यात कान्हे ते टाकवे, भोयरे ते सावळा, वाहनगाव पासून पुढे चार किलोमीटर या भागातील पट्ट्यांची सदर कामे चालू आहेत. त्या कामांमध्ये सदर ठेकेदार कुचराई करीत असून रस्त्याच्या साईट पट्ट्यांच्या खोदल्या जात आहे, त्या ठिकाणची माती व मुरूम त्याच बाजूला पसरवला जात आहे.

ज्यावेळी साईट पट्ट्या दोन्ही बाजूने एक एक मीटर भरल्या जात आहे त्यावेळी खडीवरती माती त्याच ठिकाणच्या जेसीबीच्या साह्याने पसरवली जात आहे. सदर ठेकेदार हे कुठल्याही ठिकाणावरून त्या ठिकाणी साईट पट्ट्या भरण्यासाठी मुरूम आणत नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या मूल्यांकनात मुरुमाचे मूल्यांकन असल्यास त्या ठेकेदारास मुरमाचे बिल दिले जाऊ नये असे निवेदनात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ससाणे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.