Maval News: कान्हे विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावेळीही कायम

एमपीसी न्यूज – कान्हे विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली. संस्थेच्या 13 जागांसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते, परंतु निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत निर्णय घेतला व सर्व जागा बिनविरोध करत संस्थेची परंपरा जपली. 

कान्हे विकास सोसायटीच्या एकूण 13 जागांपैकी 12 जागा बिनविरोध निवडून आल्या असून 1 जागा रिक्त राहिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. जे. तळपे यांनी काम पहिले. कान्हे विकास सोसायटीच्या आत्तापर्यंत सर्व निवडणुका बिनविरोध होत आल्याने अन्य ठिकाणच्या संस्थांसाठी वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

नवनिर्वाचित कार्यकारणीमध्ये जेष्ठांबरोबर नवतरुणांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. कान्हे विकास सोसायटीचे माजी चेअरमन व साते ग्रा. पं. मा. उपसरपंच दत्तात्रय निम्हण व जांभूळचे माजी सरपंच संतोष जांभुळकर व साते ग्रा.पं. माजी सरपंच भाऊसाहेब आगळमे यांनी विशेष प्रयत्न करत निवडणूक प्रक्रिया बिनविरोध केली.

नवनिर्वाचित संचालक
बंडोबा सातकर, दशरथ सातकर, अशोक आनंदराव सातकर, किशोर पंढरीनाथ सातकर, सुदामराव आगळमे, एकनाथ येवले, दत्तात्रेय गोदु शिंदे, प्रदीप शिवाजीराव मोहिते, विलास जांभूळकर, प्रदीप ओव्हाळ, नंदाताई देवराव सातकर, मंदाताई रमेशराव गाडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.