Maval News : तालुक्यातील 5 हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार – तहसीलदार मधुसूदन बर्गे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 5 हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार होणार असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सोमवारी (दि. 19) दिली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना घेण्यासाठी नातेवाईकांची धावपळ तसेच वाढीव किंमतीत खरेदी करावी लागत होती. वेळेत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मिताली फार्मा व रोहित एन्टरप्रायजेस यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करावे.

वडगाव येथील माऊली हॉस्पिटलमध्ये 6 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध, कामशेत येथील  पुण्योदय हॉस्पिटलमध्ये 11 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व कामशेत येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये 9 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध, तळेगाव दाभाडे येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये 17 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व तळेगाव दाभाडे येथील ढाकणे हॉस्पिटलमध्ये 16 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असुन शासनाच्या दराप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करायचे आहेत.

सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन , पुणे व संबंधित आरोग्य यंत्रणेचे प्राधिकृत आरोग्य अधिकारी यांनी सदर वितरण तक्त्यानुसार वाटप होत असलेची व सदर वितरीत औषधांचा उचित विनियोग होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करून अनियमितता आढळलेस संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.