Maval News : ‘मदत नव्हे, कर्तव्य ! मावळ राष्ट्रवादीकडून रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे तीन ट्रक रवाना

एमपीसीन्यूज : ‘मदत नव्हे, कर्तव्य !’ या भावनेतून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले ट्रक रवाना करण्यात आले. येत्या काही दिवसांत आणखी जीवनाश्यक वस्तूंचा साठा पाठविण्यात येणार असल्याचेही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठे संकट नागरिकांवर कोसळले आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त नागरिकांच्या सेवार्थ खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स, माताभगिनींसाठी साड्या, इतर खाद्यपदार्थ असे जीवनावश्यक साहित्य रायगड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्र कोकणवासीयांच्या मदतीला धावून आला आहे.अशा संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत शक्य ती मदत करणे हीच खरी माणुसकी आहे, असे आमदार शेळके म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, नगरसेवक सुनील ढोरे, चंद्रजीत वाघमारे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, मावळ खादी ग्रामोद्योग संघ अध्यक्ष अंकुश आंबेकर, रोहिदास गराडे, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, मावळ तालुका संघटक ज्योती जाधव, सोमनाथ धोंगडे, विकी ढोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.