Maval RPI : मावळ रिपाइंच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी धडक मोर्चा

एमपीसी न्यूज- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) तालुका मावळ (Maval RPI) यांच्या वतीने मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी पक्षाच्या वतीने दि.29 सप्टेंबर रोजी वडगाव मावळ तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात आला व निवेदन देण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व मावळ तालुका (Maval RPI) अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले. पक्षाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला,तरुण,तरुणी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Nigdi Crime News: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देताना औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांचे प्रतिनिधी व आरपीआयचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पुढील पंधरा दिवसांत ठेवणे व भूमिपुत्रांना 50 नोकऱ्या देणे, या प्रमुख मागण्या पत्रकाद्वारे करण्यात आल्या. संबंधित बैठक न झाल्यास पक्षाच्या वतीने कंपन्यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुका यांच्या वतीने देण्यात आला.

सदर मोर्चामध्ये पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका (Maval RPI) अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष समीर जाधव, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सदस्य यमुनाताई साळवी तसेच गणेश गायकवाड, अतुल सोनवणे, मालनताई बनसोडे, संतोष कदम, अंकुश सोनवणे, भावनाताई ओव्हाळ, किसन आहिरे, अनिल भांगरे, अशोक सरवते, नितीन ओव्हाळ, सुनील गायकवाड, कमालशील म्हस्के, सिद्धार्थ चौरे, बाळासाहेब जाधव, दादासाहेब वाघमारे, रोहिणी देसाई, सागर देसाई, रुपेश गायकवाड, सिद्धार्थ भालेराव, प्रफुल्ल भालेसईन, नागेश ओव्हाळ, सुनील भालेराव, गौतम गायकवाड, सुमित ननावरे, खंडू वाघमारे, विकास शिंदे, अरविंद रोकडे, शरद सोनवणे, नीलेश यादव, अभिजित सोनवणे, राजू देसाई, प्रदीप बनसोडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.