Maval: राष्ट्रवादीची उमेदवारी सुनील शेळके यांना, कार्यकर्त्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ मतदारसंघातून तळेगाव दाभाडे नरगपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांना आज (गुरुवारी) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात शेळके यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, तळेगाव नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश खांडगे, नगरसेवक संतोष भेगडे यांच्यासह आघाडीचे नेते कार्यकर्त्यांनी उमेदवारीचे स्वागत केले आहे. घड्याळाचा जल्लोष करत पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

शेळके भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी त्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तिस-यावेळी भाजपची उमेदवारी विद्यमान आमदार बाळा भेगडे यांना मिळाली आहे. त्यामुळे शेळके यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.