Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुदाम कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज : कदमवाडी (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुदाम बाळासाहेब कदम (वय 49) यांचे मंगळवार (दि 29) रोजी रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेला दीड महिना त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांचे ते पती तर प्रगतीशील शेतकरी शामराव कदम, उद्योजक विठ्ठल कदम व पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य शांताराम कदम यांचे ते बंधू होत. कदमवाडी मावळ येथे आज 9: 00 वा त्यांचा अंत्यविधी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.