Maval : कंपनीत मेसमध्ये अंडी घेताना अडवले म्हणून दोघांना बेदम मारहाण, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीत मेसमध्ये जेवताना (Maval) अंडी घेताना अडवले व कामावरून काढून टाकले या रागातून तिघांनी लोखंडी सळईने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.2) मिंढेवाडी, मावळ येथे घडली आहे. 

यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिपेश चंद्रकांत भवारी (वय 22), विजय रघुनाथ भवारीवय (वय 23), शांताराम धोंडू फोडसे (वय 29) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी संजित गुरुप्रसाद कुमार (वय 24 रा.नवलाख उंब्रे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri : नोटीस पाठवल्याच्या कारणावरून मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपेश हा इमरसन कंपनीमध्ये क्लीनींग काम करत होता. यावेळी तो अंडी घेत असताना फिर्यादी यांनी आरोपीला अंडी घेऊ नको म्हणून हटकले. तसेच कामावरून काढून टाकले. याचा राग मनात (Maval) धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच फिर्यादीचे मित्र मोहित कुमार यांना देखील मारहाण करत जखमी केले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.