Maval : मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद देणार – जयंत पाटील

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (Maval )पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी (Maval )संघटनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड,पुणे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अतुल राऊत तसेच नवलाख उंब्रे गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
नवलाख उंब्रे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
मुंबईच्या दिशेने जात असताना अचानकपणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दत्तात्रय पडवळ यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले येत्या काळामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून युवकांचा संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करून शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवण्याच्या सूचना दिल्या.अचानकपणे दिलेल्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.