Talegaon Dabhade : सामुदायिक विवाह सोहळा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, (Talegaon Dabhade) आमदार सुनील शंकरराव शेळके फाउंडेशन व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगांव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची दोन्ही संस्थांच्या वतीने जोरदार तयारी चालू आहे. नुकतेच तळेगाव दाभाडे स्टेशन येथे सेवाधाम हॉस्पिटल जवळ सक्सेस चेंबर्स शॉप नंबर 1 या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपर्क कार्यालयाचे उदघाटन डिस्ट्रिक्ट 3131चे मेंबरशिप डायरेक्टर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 26-27 रो. नितीन ढमाले यांच्या हस्ते झाले.

डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये 144 क्लब असून समाजाच्या हिताचा सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम रोटरी सिटी हा एकमेव क्लब घेत असून गोरगरीब लोकांच्या मुला मुलींची लग्ने लावण्याचा एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे असे प्रतिपादन रो नितीन ढमाले यांनी करताना डिस्ट्रिक्ट 3131 रोटरी सिटीच्या भक्कमपणे पाठीशी आहोत पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील क्लब निश्चितपणाने या समाज उपयोगी अनोख्या उपक्रमास मदत करतील अशी ग्वाही ढमाले यांनी देताना रोटरी सिटीच्या उपक्रमांचे कौतुक केले.

तर समाजातील गोरगरीब लोकं आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढतात त्यामुळे प्रपंचाची आर्थिक घडी खालावते हे होऊ नये त्यांना समाधानाने लग्न करता यावीत यासाठी रोटरी सिटी क्लब सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे असे प्रतिपादन (Talegaon Dabhade) संस्थापक अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख रो.विलास काळोखे यांनी केले व रोटरी सिटीच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती कथन केली.

सामुदायिक विवाह सोहळ्यातून सर्वसामान्य जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष रो.सुरेश शेंडे यांनी करताना सामुदायिक सोहळा 2024 ची रुपरेषा व कार्यपद्धती विशद केली तसेच वधू-वरांनी पाळावयाचे नियम व लग्न सोहळ्यात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती सांगितली.

Pune : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वीकारला पुणे म्हाडा अध्यक्ष पदाचा कार्यभार

रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम.आय.डी.सी.चे माजी अध्यक्ष ॲड. मच्छिंद्र घोजगे,कोंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणपत कदम, टाकवे बु|| चे उपसरपंच अविनाश असवले,क्लब ट्रेनर व सामुदायिक सोहळा समितीचे समन्वयक रो.दिलीप पारेख यांनी मनोगताद्वारे ह्या अनोख्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी रो.भगवान शिंदे यांनी केले तर उपाध्यक्ष रो. किरण ओसवाल यांनी आभार मानले.

विशेष बाब म्हणजे संपर्क कार्यालय दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडे राहणार आहे. विहित कागदपत्रांसह लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नोंदणीसाठी वधू-वरांना पालकांसमवेत समक्ष उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

रो. संजय मेहता,रो.विश्वास कदम, रो.रघुनाथ कश्यप,रो.सुरेश दाभाडे, रो.प्रशांत ताये,रो.प्रदीप टेकवडे, रो.रामनाथ कलावडे,रो.प्रदीप मुंगसे,रो.बाळासाहेब चव्हाण, रो.बाळासाहेब रिकामे,रो.हर्षल पंडीत, रो.तानाजी मराठे,रो.बसाप्पा भंडारी, रो.रमेश मराठे,रो.राकेश ओसवाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.