Nashik News : “मै भी डिजिटल” प्रशिक्षण कार्यक्रम

एमपीसी न्यूज :  गुरुवार दिनांक 21/1/2021 रोजी  बँक ऑफ महाराष्ट्र पंचवटी  शाखेने “मै भी डिजिटल” कार्यक्रम पथविक्रेत्यांना / फेरीवाल्यांना प्रशिक्षण अंतर्गत आयोजित केला होता.

कार्यक्रमासाठी उपायुक्त सौ. करुणा डहाळे, नासिक महानगरपालिका, बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक चे क्षेत्रीय प्रबंधक तथा महाप्रबंधक श्री एन एस देशपांडे, पंचवटी  शाखेचे मुख्य प्रबंधक  श्री. संदीप पोटे, तसेच कर्ज वितरीत झालेले सर्व पथविक्रेते लाभार्थी उपस्थित होते.

जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री अर्धेंदु शेखर तसेच श्री कश्यप पाटील  यांनी डिजिटल व्यवहार बाबत मार्गदर्शन केले व QR कोड देऊन ते वापरण्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच cashless  व्यवहार ला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना याबाबत प्रोत्साहित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थ्यांचे QR कोड स्कॅन करून र.रु.१/- चे व्यवहार करण्यात आले.

उपायुक्त करूणा डहाळे, नाशिक महानगरपालिका यांनी स्वनिधि से समृद्धि – सोशल इकोनॉमिक प्रोफाईल “समृद्धी योजने” बाबत माहिती देण्यात आली व शासनाच्या विविध आठ योजनेचा लाभ कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांनी मनपा विभागीय कार्यालय येथे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तात्काळ जावे व  मिळालेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरून 7% व्याजाचा व डिजिटल व्यवहार करून मासिक कॅशबॅक चा फायदा सर्व पथविक्रेत्यांनी घ्यावा असे आव्हान करण्यात आले.

“मै भी डिजिटल कार्यक्रम” साठी 50 लाभार्थी उपस्थित होते.  उपस्थित सर्व लाभार्थ्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र ने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करून बँकेचे आभार मानले व डिजिटल व्यवहाराचा जास्तीत जास्त वापर करू असे आश्वासन पथविक्रेत्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.