NCP Kothrud : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोथरूड येथे सदस्य नोंदणी अभियान रथ मोहिम

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Kothrud) वतीने सभासद नोंदणी अभियान रथ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम कोथरूड विभागात 7 ठिकाणी राबविण्यात आली. या वेळी गुरुवारी (दि.13) 258 जणांनी सदस्य नोंदणी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर आणि मनोज पाचपुते, स्वप्नील दुधाने,शशांक काळभोर, तेजस बनकर, पृथ्वी दहिवाल, आशिष शिंदे,लखन सौदागर सूरज गायकवाड, अनमोल केमसे, किशोर भगत, अमित गोडंबे, मोहित बराटे आणि बंटी शेठ तांबे आदी उपस्थित होते.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना (NCP Kothrud) अधिक मजबूत करणे, पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करणे हा या अभियानामागील उद्देश होता. सभासद नोंदणी अभियान रथ कोथरूड विभागात विविध मध्यवर्ती भागात फिरविण्यात आला.

Mhalunge Double Murder Case : म्हाळुंगे दुहेरी खून खटल्यातील आरोपी 36 तासात जेरबंद

त्यामध्ये भारती विद्यापीठ चौक केळेवाडी, वनाज कॉर्नर, सागर कॉलनी, शिवांजली मित्र मंडळ शास्त्रीनगर, कोथरूड डेपो चौक, गोसावी वस्ती, डी मार्ट चौक करणारा आणि कर्वेनगर चौकात या सभासद अभियान रथाच्या माध्यमातून 258 जणांनी नोंदणी केली अशी माहिती युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.