MIDC News : शहर सौंदर्यकरण अभियानात एमआयडीसीचा समावेश करावा – अभय भोर

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (MIDC News) शहर सौंदर्यकरण अभियानात एमआयडीसीचा समावेश करावा, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.

शहर सौंदर्यकरण स्पर्धेमध्ये महानगरपालिकेने भाग घेतला असून संपूर्ण शहरात चौक, रस्ते, लाईट विविध प्रकारचे सौंदर्यकरण हाती घेतलेले आहे. परंतु, एमआयडीसी परिसरातून महानगरपालिकेला येणारा महसूल मोठ्या प्रमाणात असून देखील आयुक्तांनी एमआयडीसीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एमआयडीसी परिसर हा तीन ते साडेतीन हजार एकर असून या परिसरामध्ये अनेक नामांकित कंपन्या व छोट्या-मोठे उद्योग आहेत.

Hemant Patil : बेताल वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी राज्यपालांची हकालपट्टी करा-हेमंत पाटील

देश-विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी भेट देण्यास येथे येत असतात. शहरांमध्ये सौंदर्यकरणांमध्ये एमआयडीसीचा समावेश करायलाच पाहिजे. शहर स्वच्छ करण्याच्या अभियानाच्या अनेक उपक्रमांमध्ये फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. वेळोवेळी पालिकेला सहकार्य करण्यास उद्योजक पुढाकार घेतात.

सौंदर्यकरण अभियानात अनेक (MIDC News) उद्योजक आपला सहभाग देखील घेण्यास तयार असून महानगरपालिकेचा त्या बाबतीत आखडता हात दिसून येतो. एमआयडीसी सुशोभीकरणासाठी योग्य परवानग्या उद्योजकांना वेळेत मिळत नसून त्याबद्दल उद्योजक क्षेत्रामध्ये नाराजी व्यक्त होत आहे, असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले. तसेच, भोर म्हणाले, की शहर सौंदर्यकरण अभियानात एमआयडीसी परिसराचा समावेश करावा, अन्यथा हा औद्योगिक क्षेत्रावर पूर्णपणे अन्याय केल्यासारखे होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.