Mizoram Election Result : मिझोरममध्ये सत्ताबदल ;झोराम पीपल्स मूव्हमेंट करणार सरकार स्थापन

एमपीसी न्यूज – मिझोरममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबरला ( Mizoram Election Result ) मतदान पार पडले होते.निवडणूक आयोगाने मिझोरममधील निकालाची तारीख बदलली होती.  हाती आलेल्या आकडेवारीनुसार,झोरम पीपल्स मूव्हमेंटने निर्णायक विजय मिळवल्याने सरकार स्थापन करणार आहे. झेडपीएम सध्या 27 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट 10 जागांपर्यंत मर्यादित आहे. भाजप 2 जागांवर आघाडी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून केवळ1 जागेवर घसरल्याचे चित्र आहे.

Pune Breaking : धक्कादायक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना खोदकामात आढळले ग्रेनेड

झेडपीएमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लालदुहोमा यांनी सेरछिप मतदारसंघात स्पष्ट विजय मिळवला आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री आणि MNF उमेदवार आर लालथांगलियाना यांना दक्षिण तुइपुई जागेवर ZPM च्या जेजे लालपेखलुआ विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

झेडपीएमचे लालनघिंगलोवा हमर यांनी आयझॉल पश्चिम-2 मतदारसंघात राज्याचे कॅबिनेट मंत्री लालरुतकिमा यांचा पराभव करत विजय मिळवला. तुईचांगमध्ये, झेडपीएमचे डब्ल्यू. छुआनवमा विद्यमान उपमुख्यमंत्री तवन्लुइया यांच्यावर विजयी झाले.

1987 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून मिझोरामच्या राजकीय परिदृश्यावर कॉंग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट (MNF) यांचे वर्चस्व होते. परंतू आता सत्ताबदल होऊन झोराम पीपल्स मूव्हमेंट बहुमत मिळवून सरकार स्थापन करणार ( Mizoram Election Result ) आहे.

अंतिम निकालाची आकडेवारी

एकूण जागा – 40

झोराम पीपल्स मूव्हमेंट- 27

मिझो नॅशनल फ्रंट – 10

भाजप – 2

काँग्रेस -1

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.