Chakan : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; 22 म्हशींची सुटका

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी तीन वाहनांमधून 22 म्हशी घेऊन जात (Chakan)असताना चाकण पोलिसांनी कारवाई करून तिन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी 22 म्हशींची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री साडे अकरा वाजता पुणे नाशिक महामार्गावर बैल बाजाराच्या बाहेर करण्यात आली.

जमीर हुसेन शेख (वय 30, रा. जुन्नर, पुणे), पापा (Chakan)फक्रुद्दीन शेख (वय 30, रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे), आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल नांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विना परवाना चारा पाण्याची सोय न करता 22 म्हशींना दाटीवाटीने तीन वाहनांमध्ये भरले. जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र न घेता आरोपी 22 म्हशींना कत्तलीसाठी घेऊन जात होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी बैल बाजाराच्या बाहेर तीन वाहने अडवून कारवाई केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.